VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना विद्यार्थ्यांचे निवेदन.
ज्ञानाची कमतरता व अध्यापन कौशल्य नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा करावा लागत आहे सामना.
वारंवार तक्रार करूनही प्राचार्यांनी केले दुर्लक्ष.
गडचिरोली/चामोर्शी, ०५ मार्च २०२४::- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय )चामोर्शी येथे इलेक्ट्रिशन ट्रेड ला असलेले शिक्षक ए.बी.धनविजय यांना योग्य प्रकारे शिकवता येत नसल्याने व विषयाच्या ज्ञानाची कमतरता असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी लेखी तक्रार प्राचार्यांकडे वारंवार करूनही अजूनपर्यंत बदली न झाल्याने शासन स्तरावरून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत असलेल्या धन विजय यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अशी मागणी केली. आयटीआय मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असून त्यांची बदली होण्याच्या दृष्टीने लवकरच शास्त्र पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी निवेदनकर्त्या विद्यार्थ्यांना दिला.
