VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,०५ मार्च २०२४::- चामोर्शी तालुका मुख्यालयापासून आष्टी रोडवर ५ किलोमीटर अंतरावरील सोनापुर गाव आहे.त्याच सोनापूर क्रासिंग जवळ दिनांक ४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा अपघात झाला.त्यात सुरेश महादेव दुधबावरे, रा. सोनापूर यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार सुरेश महादेव दूधबावरे आणि लुकेश रामभाऊ दूधबावरे हे दोघेजण आपल्या काही कामा निमित्य MH३३ Z 6877 या दुचाकीने चामोर्शीला गेले होते. आपले काम संपवून परत स्वगावी येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG 07,BG5597 ने दुचाकी वाहनाला जब्बर धडक दिली. धडक एवढी भयंकर होती की त्यात मृतक सुरेश दुधबावरे वय (५५) वर्ष यांच्या जागीच मृत्यू झाला. तर लुकेश रामभाऊ दुधबावरे वय (३५) वर्ष हा किरकोळ जखमी आहे. या अपघाताची माहिती चामोर्शी पोलीस स्टेशनला मिळतात चामोर्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विश्वास पुल्लुरकर तसेच आपल्या चमुसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठविण्यात आला. पुढील तपास चामोर्शी पोलीस निरीक्षक विश्वास पुल्लुरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.
