VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
आमदार खासदार यांच्या उपस्थितीत मार्कंडेश्वराची महापूजा संपन्न.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सपत्नीक केले मार्कंडेश्वराचे पूजन.
गडचिरोली/मार्कंडादेव,८ मार्च २०२४::-महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा देवस्थान येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी खासदार अशोकजी नेते यांच्या उपस्थितीमध्ये पहाटे महापूजा संपन्न झाली. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वराकडे जनतेच्या कल्याणाची कामना करीत जनेतला सुखाने समृद्ध कर असे साकडे घातले.
महाशिवरात्रीच्या पर्वाच्या सर्व जनतेला आमदार देवराव जी होळी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या . या महापूजेच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती सौ बिणाराणी होळी उपस्थित होत्या.
