Saturday, May 23, 2026
HomeBrahmapuriब्रम्हपुरी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी...

ब्रम्हपुरी शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२९ मार्च २०२४::-या भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात,डिजे च्या तालात रॅलीत सहभागी खासदार अशोक नेते व लोकसभा प्रभारी तथा माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा.          ब्रम्हपुरी शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.हिंदूह्रदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी “हिंदवी स्वराज्याची स्थापना” करून आपल्या संस्कृतीचे संरक्षण करून संवर्धन केले.त्यांचा अलौकिक पराक्रम येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा.याकरिता दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रम्हपुरी शहरात शिवजयंती उत्सव समिती ब्रम्हपूरीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्य, दिव्य, ढोल ताशांच्या गजरात,डिजेच्या मनोहारी तालात नेत्रदीपक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.      या रॅलीत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते तसेच चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे लोकसभा प्रभारी तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी या आनंदोत्सवात उपस्थित राहून शिवजयंती उत्सव समिती ब्रम्हपूरीच्या शिवभक्तांचा आनंद द्विगुणित केला.        शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहचावी यासाठी शिवरायाची पालखी सोहळ्याचे आयोजन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय घोषाने ब्रम्हपुरी शहर दुमदुमली तसेच बालगोपालांनी विविध वेशभूषा परिधान करून महापुरुषांची प्रतिमा साकार करित शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,अरुण हरडे,भारत खटी तसेच मोठया संख्येने ब्रम्हपुरी वासिय नागरिक बंधू भगिनीं,युवावर्ग,बालगोपालांसह उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular