VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/भामरागड,३० मार्च २०२४::- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे विभाग कोषाध्यक्ष “श्री संतोष सुरावार सर” आणि पदाधिकारी यांनी मतदार जनजागृती अभियाना
अंतर्गत दिनांक २९ मार्च २०२४ ला गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जाऊन श्री प्रकाशभाऊ आमटे,ज्येष्ठ समाज सुधारक व त्यांची पत्नी श्रीमती मंदाताई आमटे आणि लोक बिरादरी हायस्कूल हेमलकसा येथे भेट देऊन मतदार जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी श्री दिलीप तायडे जिल्हा संघटन मंत्री प्राथमिक, श्री बाळबुद्धे सर, श्रीमती देशमुख मॅडम, श्रीमती नैताम मॅडम, श्री कुलकर्णी सर आणि श्री कापगते सर उपस्थित होते.
