Saturday, May 23, 2026
HomeChamorshiजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा(माल) येथे नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/चामोर्शी,०३ जुलै २०२४::-तालुक्यातील लखमापूर बोरी केंद्रांतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल )येथे शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी 1जुलै 2024 रोजी गावातील दाखलपात्र नवागत विद्यार्थ्यांचे ग्रामपंचायत मुरखळा माल‌‌‌ चे पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे प्रमुख उपस्थितीत गावातुन प्रभात फेरी काढून प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तके,खाऊ देऊन मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले.

  याप्रसंगी ग्रामपंचायत मुरखळा माल‌‌‌ चे सरपंच श्री भास्कर बुरे यांचे अध्यक्षतेखाली व शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती श्री धनराज बुरे, ग्रामविकास अधिकारी श्री राजेंद्र बारसागडे यांचे प्रमुख उपस्थितीत शाळा पुर्वतयारी मेळावा 2 चे आयोजन करण्यात आले.    याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री लोकेश सोमनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री सोमनाथ मेश्राम,संगिता किर्तीदास सोमनकर, सरिता लोशन रामटेके,साधना रविंद्र सरपे,सरिता महेश बुरांडे,शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश बोईनवार,पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे,चंद्रकांत वेटे ,जगदीश कळाम, राजकुमार कुळसंगे, कमलाकर कोंडावार, अंगणवाडी सेविका सुरेखा डोमदेव राऊत,पुष्पा संजय बुरे, दाखलपात्र नवागत विद्यार्थ्यांचे पालक गुणाजी श्रावण पोरटे, बाबुराव सोमाजी धानोरकर,सोनी मंगेश राऊत,सोना सुधाकर सातारे,राणी सचिन सरपे,राधा सतिश झबाडे,शकुंतला संतोष भोयर,प्रतिमा अनंत पवार,रुपाली अनिल गाडेमोडे,गीता छत्रपती दुधबावरे,ज्योत्स्ना सचिन तुंबडे,सोनी योगेश राऊत,सारिका मोरेश्वर तुंबडे,कुंदा जिवनदास जवादे,ग्रामपंचायत कर्मचारी सचिन तुंबडे,शालेय पोषण आहार मदतनीस पुष्पा मोहूर्ले, नयना मोहूर्ले ,सरिता सरपे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी,दाखलपात्र नवागत विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांचे पालक,गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आजच्या शाळा पुर्व तयारी मेळावा 2 च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश कळाम सर यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री राजकुमार कुळसंगे सर यांनी मानले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular