Saturday, May 23, 2026
HomeAheriमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,, आरेंदा फाटा ते...

मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते रस्त्याचे लोकार्पण,, आरेंदा फाटा ते ताडगुडा ग्रामस्थांना रस्ता झाला सोईस्कर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/अहेरी,०३ जुलै २०२४::- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते नुकतेच पेरमिली मुख्य रोडवरील आरेंदा फाटा ते ताडगुडा गावातील सहा किलो मिटर डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.   प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सदर रस्त्याचे काम करण्यात आले असून आता आरेंदा व ताडगुडा येथील गावकऱ्यांना रस्ता सुलभ झाल्याने रस्त्याचे त्रास व अडचण दूर झाले आहे.   या प्रसंगी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी , गावाच्या विकासासाठी रस्ते व दळणवळणाची सोय अत्यावश्यक असून गाव खेड्यातील रस्ते मुख्य मार्गांना जोडण्यासाठी आमचे अविरत प्रयत्न सुरू असून बहुतांश ग्रामीण भागातील रस्ते बनविण्यात आले असून शिल्लक व उर्वरित रस्ते बनविण्यासाठी आमचे प्रयत्न व शासनदरबारी पाठपुरावा सुरू असल्याचे आवर्जुन सांगितले.तत्पूर्वी फित कापून डांबरीकरण रस्त्याचे उत्साहात लोकार्पण केले.

 यावेळी प्रामुख्याने अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, येरमणार ग्राम पंचायतीचे माजी सरपंच बालाजी गावडे, आरेंदा ग्रा.पंचायतीचे सरपंच व्यंकटेश तलांडी, उपसरपंच बुज्जी आत्राम, ग्रां. पं.सदस्य मुरा आत्राम, मांतया आत्राम, सुरेंद्र अलोणे, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, साधू आत्राम, राजू तलांडी, मादी आत्राम आदी व आरेंदा येथील गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular