Friday, May 22, 2026
HomeSironchaमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सिरोंचा येथील मजुराला दिला मदतीचा हात...

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सिरोंचा येथील मजुराला दिला मदतीचा हात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली/सिरोंचा,०१ऑगस्ट २०२४::- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज हे आपल्या सामाजिक कार्यासाठी, आपल्या दानशूर वृत्तीसाठी तसेच प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या संकटात सदैव तत्पर असा नेता म्हणून प्रसिद्ध आहेत.काल जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथील प्रभाग क्र.०६ येथील रहिवासी सत्यम भूमय्या दासरी हे मजुरी काम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात. ते अनेक दिवसांपासून बिमारीने त्रस्त आहेत. त्यांना तात्काळ सिरोंचा वरून नागपूर येथे उपचारासाठी नेने गरजेचे होते. पण खाजगी गाडी किरायाने करून जाणे आर्थिक अडचणीतमुळे शक्य नव्हते. ही माहिती स्थानिक कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना सांगितले त्यावेळी राजे साहेबांनी तात्काळ मदतीचा हात देत नागपूरला पेशंटला नेण्यासाठी गाडी करून दिली व आपण पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन दिले.

यावेळी दासरी कुटूंबातील सदस्य तसेच स्थानिक राजे समर्थक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular