
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
नागेपल्ली येथील प्रभाग क्रमांक-२ मध्ये दिली भेट.
गडचिरोली/अहेरी,०८ सप्टेंबर २०२४::- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे आज आलापल्ली दौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी नागेपल्ली येथील प्रभाग क्रमांक-२ मध्ये विविध ठिकाणी भेट देऊन दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.सध्या गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. या उत्सवात महाराष्ट्रात काही ठिकाणी दीड दिवसाच्या गणपतीची परंपरा आहे.

गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सायंकाळच्या सुमारास दीड दिवसाच्या घरगुती गणपतीचा विसर्जन केला जातो.नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक-२ मध्ये (टीचर कॉलनी) येथे भेट देऊन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

यावेळी प्रभाग क्रमांक-२ मधील नागरिकांची विसर्जनसाठी जय्यत तयारी सुरू होती.दरम्यान त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली आणि विविध ठिकाणी भेट देऊन पूजाअर्चा करत बाप्पांचे दर्शन घेतले.राजेंनी उपस्थिती दर्शविताच नागरिकांनी देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी राजेंचे कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक-२ चे नागरिक उपस्थित होते.
