
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
युवा नेते रामेश्वरराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांची उपस्थिती.
बैठकीत ‘इस बार , फिरसे बाबा की सरकार’ अशी जयघोषणा.
Gadchiroli/अहेरी,१६ सप्टेंबर २०२४::- आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे (महायुतीचे अजित दादा पवार गटाकडून) पहिल्याच यादीत उमेदवारीची घोषणा होताच युवा नेते रामेश्वरराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली धरमपूर येथे रविवारी संकल्प बैठक झाली. बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, भाजपाचे तथा आलापल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, रा. काँ.चे ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला विंगचे पुष्पाताई अलोणे, सारिका गडपल्लीवार, अरुण मुक्कावार, राजेश्वर रंगूलवार, किशोर करमे आदी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
येत्या विधानसभेच्या निवडणूकीत अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात महायुतीचे संभाव्य उमेदवार मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी संकल्प बैठक पार पडल्या नंतर अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात ‘इस बार, फिरसे बाबा की सरकार’ अशी जय घोषणा देण्यात आले. बैठकीत अहेरी, आलापल्ली व परिसरातील प्रामुख्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पदाधिकारी, नगर सेवक, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे कट्टर समर्थक बहुसंख्येने उपस्थित होते.
