Saturday, May 23, 2026
HomeMulcheraमुलचेरात विविध पक्षांना धक्का,, शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश...

मुलचेरात विविध पक्षांना धक्का,, शेकडो कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

पक्षाचा दुपट्टा टाकत मंत्री आत्राम यांनी केले स्वागत

Gadchiroli/अहेरी,१६ सप्टेंबर २०२४::- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) जाहीर प्रवेश घेतला.यावेळी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकत सर्वांचे स्वागत केले.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या परिसरात केलेले विकास काम, विकासात्मक कामासाठी खेचुन आणलेली निधी,तरुणांना लाजवेल असा उत्साह व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा राकॉ पक्षात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे.सोमवार (१६) सप्टेंबर रोजी मुलचेरा तालुक्यातील येल्ला,मरपल्ली,मच्छिगट्टा आणि मरपल्ली टोला येथील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकत पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले आणि पक्ष मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते अमित मुजुमदार,सत्यवान मडावी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular