
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
Gadchiroli/अहेरी,१८ सप्टेंबर २०२४::- अहेरी येथील बेघर कॉलोनी मधील मनोज ठाकरे यांची पत्नी कर्करोगाने ग्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे.
ही बाब आविस चे पदाधिकारी राकेश आत्राम यांनी आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ उपचारासाठी आर्थिक मदत करून सहकार्य केले.
या वेळी मनोज ठाकरे,अभिषेक मांडवगडे, राकेश आत्राम,विनोद कावेरी,संजय आक्केवार,माजी सरपंच विजय कुसनाके,सुधाकर कोरेत,नितीन खोब्रागडे उपस्थित होते.
