Saturday, May 23, 2026
HomeChamorshi"दुर्देवी घटना" चामोर्शीतील टी पॉइंट येथे भिषण अपघात,, ट्रकच्या जब्बर धडकेत ६५...

“दुर्देवी घटना” चामोर्शीतील टी पॉइंट येथे भिषण अपघात,, ट्रकच्या जब्बर धडकेत ६५ वर्षीय वृद्ध इसमाचा जागीच मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,०९ डिसेंबर २०२४::- चामोर्शी शहरात रविवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आष्टी टी पॉइंट येथे आष्टीकडून येणाऱ्या लोखंडाची तार वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका वृद्धाला धडक देत चिरडले. यात त्या वृद्धाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. मृत वृद्धाचे नाव मलेश भिमन्ना कनकुटलावार (वय ६५) रा. हनुमान नगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, असे आहे. हनुमान नगरातील प्रभाग क्रमांक १५ मध्ये राहणारे मलेश कनकुटलावार परिस्थितीने खूप गरीब असल्याकारणाने हरेश गांधी यांच्या राईस मिलमध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते.

ते आपल्या सायकलने रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या घरी जवन करून आष्टी कॉर्नर येथून वळून हरेश गांधी यांच्या राईस मिलकडे जाण्यासाठी सायकल वळवत असताना आष्टीकडून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्र. सी जी ०७- सी आर ७२९९ ने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात दरम्यान आरोपी ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता पात्र 5.30 च्या सुमारास आरोपी (कुतेस्वर गिरीश हरमुख) वय 23 वर्ष रा.बिषेगाव जि.दुर्ग. राज्य छत्तीसगढ याला अटक केली आहे

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला. पंचनामा करून मलेश कनकुटलावार यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृतक मलेश कनकुटलावार यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.मलेश कनकुटलावार यांचं अपघाती मृत्यू झाल्याकारणाने वार्डामध्ये पूर्ण शोककळा पसरली आहे. चामोर्शी पोलीस निरीक्षक अमोल कादबने यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पूढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बनसोडे चामोर्शी करीत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular