Sunday, May 24, 2026
HomeChamorshiमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भांडेकर सर यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या ज्वलंत...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भांडेकर सर यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर शिक्षणाधिकारीशी भेट व चर्चा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर सर यांचे नेतृत्वात शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब यांचेशी प्रत्यक्ष भेट व चर्चा.

गडचिरोली/चामोर्शी, १५ जानेवारी २०२५::- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोली* चे वतीने *सन्माननीय मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब* यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांबाबत अवगत करण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने… ▪️ *1) कोर्टाच्या आदेशानुसार १ जानेवारी २००६ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीतील १५ टक्के प्रोत्साहन भत्ता थकबाकी लवकरात लवकर अदा करण्यात यावी.* ▪️ *2) गडचिरोली जिल्ह्यातील विस्तार अधिकारी( शिक्षण) केंद्रप्रमुख,उच्च श्रेणी मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक व विषय शिक्षक (भाषा,गणित/विज्ञान व सामाजिक शास्त्र)यांची रिक्त असलेली पदे सेवाज्येष्ठतेनुसार त्वरित भरण्यात यावी. ▪️3)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना‌ एक आगाऊ वेतनवाढ त्वरित देण्यात यावी. ▪️4) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कार्यरत उर्वरित वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कडून मागवुन ते त्वरित मंजूर करणे. ▪️5) 4 टक्के सादील अनुदान जि.प.शाळांना त्वरित अदा करणे. 6) श्री निलकंठ आवारी सर पं.स.गडचिरोली यांची पाचव्या वेतन आयोगाची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. 7) निवडश्रेणी लागु झालेल्या शिक्षकांना थकबाकी त्वरित अदा करण्यात यावे.(संजय कोंकमुटीवार व इतर पं.स.अहेरी) 8)B.L.O.सह इतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढण्यात यावे

9) कोर्टद्वारा समायोजन झालेल्या उर्वरित सर्व शिक्षकांना लवकरात लवकर भारमुक्त करण्यात यावे. 10)सन २०१८ मध्ये पंचायत समिती सिरोंचात प्रशासकीय बदली होऊन आलेल्य शिक्षकांचे बदली प्रवास भत्त्याचे देयके त्वरीत अदा करण्यात यावे.*(साईनाथ सोनटक्के व इतर) 11) प्रलंबित वैद्यकीय प्रतिपुर्ती बिले,अर्जित रजा बिले तात्काळ मंजूर करुन त्वरित निकाली काढण्यात यावे.* (रविंद्र आडे,गोपाल डे,हिरा परशुराम दुंदलवार,संजय कोंकमुटीवार,मुकुल सडमेक व इतर ).

12) सेवानिवृत्त शिक्षकांचे तसेच मयत शिक्षकांचे थकित वेतन देयके, उपदान,अंशराशीकरण निधी,G.I.S.ची रक्कम संबंधितांना उपलब्ध करून देणे.*(स्व.विजय माधव मडावी, स्व.मोतीराम सिडाम,स्व.सोनु कुमरे, स्व.गोपीनाथ कोडापे,स्व.सुधीर अडेटवार व इतर)

13)D.C.P.S. धारक शिक्षकांचे D C.P.S.मधील रक्कम N.P.S. खात्यामध्ये जमा करण्यात यावी.*(कु‌.सोनाली कापकर व इतर). 14) सेवा पुस्तक अद्ययावत करण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्प लावण्या संदर्भात संबंधितांना सुचना देण्यात यावे. 15) श्री अनिल रुषी चांदेकर पं‌.स.अहेरी यांचा सहाव्या वेतन आयोगाचा ४ था व ५ वा हप्ता त्वरीत अदा करण्यात यावे. वरील मुद्द्यांचे अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेसोबत चर्चेदरम्यान मा.शिक्षणाधिकारी श्री बाबासाहेब पवार साहेब,मा.उपशिक्षणाधिकारी श्री विवेक नाकाडे साहेब,मा.सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुमपेटीवार साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब यांनी सर्व प्रलंबित समस्या लवकरच निकाली काढण्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक,विषय शिक्षकांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे बदलीने आलेल्या शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ लवकरच देण्याची कार्यवाही करण्यात येईल. कोर्टद्वारे समायोजन झालेल्या उर्वरित शिक्षकांना लवकरच भारमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

याप्रसंगी प्रशासनाचे वतीने मा.उपशिक्षणाधिकारी श्री विवेक नाकाडे साहेब,मा.वेतन अधिक्षक श्री वैभव बारेकर साहेब,मा.सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री धनंजय दुमपेटीवार साहेब व शिक्षक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर,जिल्हा सरचिटणीस श्री आशिष धात्रक,जिल्हा कोषाध्यक्ष राजेश चिलमवार,जिल्हा उपाध्यक्ष श्री अशिम बिश्वास, जिल्हा उपाध्यक्ष श्री लोमेश उंदिरवाडे,जिल्हा सल्लागार निलकंठ निकुरे, चामोर्शी तालुका कार्याध्यक्ष श्री सिद्धार्थ सोरते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular