Friday, July 31, 2026
HomeAheriमाजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते देवलमारी येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते देवलमारी येथील व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/अहेरी, ०७ फेब्रुवारी २०२५::- तालुक्यातील देवलमारी येथे न्यू स्टार व्हॅलीबॉल मंडळ द्वारा भव्य खुले व ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.

व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक समस्त गानली समाज कडून देण्यात येत आहे आणि तृतीय पारितोषिक मा.श्री.लाडे साहेब सचिव तथा लक्ष्मण कन्नाके सरपंच यांचे कडून देण्यात येत आहेत.

या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसनेते व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.देवलमारी गावात आगमन होतच गावकर्यांकडून तसेच मंडळ कडून ढोल तशाने गाजरात जंगी स्वागत केले.सर्व प्रथम सावित्रीबाई फुले,जोतिबा फुले,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,अशोक येलमुले ग्रामपंचायत माजी उपसरपंच,जगनाथ मडावी ग्रामपंचायत माजी उपसरपंच,महेश लेकुर ग्रामपंचायत सदस्य,शंकर आत्राम,वराठे सर,झाडे सर,संजुबाई,मधुकर गोंडला,नागेश राऊत,संजय गोंडेवार,सदशिव बामनकर,राकेश सडमेक,सचिन पांचर्य,प्रमोद गोसेलवार,लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थिती होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular