VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत गाव तलावाची स्वच्छता करणेबाबत निवेदन
गडचिरोली/चामोर्शी, ०७ फेब्रुवारी २०२५::- नगर पंचायत येथिल गाव तलावात इको कार्निया वनस्पतीमुळे तलावातील पाणी अस्वच्छ झालेले आहे. आणि या तलावात तेलंग मोहल्यातील सांडपाणी गाव तलावात येत असल्यामुळे सर्वत्र इको कार्निया वनस्पतीने वेळलेले आहे. नगरातील ब-याच महीला कपडे धुण्यासाठी, मुर्ती विसर्जणसाठी येत असतात सर्व तलावात ही वनस्पती पसरल्यामुळे त्या तलावाचे सौदर्य नष्ट झालेले आहे. तरी तलावाची व पारीची सफाई केल्यास अनेक लोकांना येथे फिरण्यासाठी याचा उपयोग होईल तलावाचा सौदर्य बाधीत राहील. तलावातील स्वच्छता करण्याबाबतचे जनता तक्रार दरबारात माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदनातून मागणी केली.
निवेदनकर्ते दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, माधवी पेशंट्टीवार, दिवाकर कोहळे, ज्ञानेश्वर कुंनघाडकर, प्रतीक राठी उपस्थित होते.
