VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, २८ फेब्रुवारी २०२५::- महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर चामोर्शी पत्रकार समितीने तब्बल 20 वर्षापासून ‘ पाणपोई ‘ चा उपक्रम सुरू केलेला आहे . परंतु कोणतेही कार्य करण्याची इच्छा असून चालत नाही तर ते कार्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि हे सर्व करण्याचं कार्य चामोर्शी पत्रकार समिती नित्यनेमाने दरवर्षी करत येत आहे आणि भविष्यातही करत राहील हे मी हमखास सांगू इच्छितो . महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रेत भाविकांची तहान भागवून पाण्याच्या रूपात ‘जीवन ‘ दानाचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचे कार्य हे प्रशंसनीय असल्याचे परखड मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांनी मार्कंडादेव येथे पत्रकार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले .
याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर , तर प्रमुख अतिथी शासकीय कंत्राटदार अमोल आईंचवार , लोकशाही वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी निलेश पटले ,जेष्ठ पत्रकार बबनराव वडेट्टीवार , अयाज शेख , गजानन बारसागडे , कालिदास बन्सोड , चंदू कुनघाडकर , अमित साखरे , नरेंद्र सोमनकर , श्रीमंत सुरपाम ,श्रावण वाकोडे , हस्ते भगत आदी उपस्थित होते .00 याप्रसंगी उद्घाटक गजाननराव भांडेकर यांनी चामोर्शी पत्रकार समिती द्वारा सुरु केलेली पाणपोई ही भाविकांसाठी व यात्रेकरूंसाठी वरदान असून समाजोपयोगी कार्य असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे , प्रास्ताविक कालिदास बन्सोड तर आभार चंद्रकांत कुनघाडकर यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व तालुका पत्रकारांनी मोलाचे योगदान दिले.
