Saturday, May 23, 2026
HomeChamorshiविदर्भाची काशी म्हणून परिचित असलेल्या मार्कंडादेव येथे भक्तगणांची सोय...

विदर्भाची काशी म्हणून परिचित असलेल्या मार्कंडादेव येथे भक्तगणांची सोय…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी, ०२ मार्च २०२५::- चामोर्शी तालुक्यातील मौजा मार्कंडादेव हे अख्या विदर्भात विदर्भाची काशी म्हणून परिचित आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रोत्सवाला महाशिवरात्रीच्या पर्वावर मार्कंडादेव येथे आज २६ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे.यात्रेदरम्यान 26 व 27 फेब्रुवारी अशे दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. त्यानंतर भाविकांना सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार असल्याची माहिती मार्कण्डेश्वर देवस्थानचे वतीने देण्यात आली. दर्शनानंतर निःशुल्क महाप्रसाद व पाण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती माहिती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या यात्रेला लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी असते या निमित्ताने वैनगंगा नदी पात्रात पवित्र स्नानासाठी भाविक गर्दी करतात. या यात्रेला छत्तीसगड, तेलंगाना व विविध राज्यातील महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मंदिराच्या जवळून उत्तर वाहिनी वैनगंगा नदी आहे तिथे स्नान करून महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. वैनगंगा नदी पात्रात स्नान करताना अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने दरवर्षी उपायोजना केल्या जातात.

“यावेळी ड्रोन कॅमेराचाही वाच असल्याचे बोलल्या जात आहे”

पोलीस दलाच्या वतीने दोन ड्रोन कॅमेरे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाणार आहेत. यासोबत आपली व्यवस्थापन टीम सोबत दोन स्वतंत्र ड्रोन कॅमेरे राहतील गरजेनुसार त्यांचा वापर केला जाणार आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी भाविकांच्या मदतीला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) ३० जवान राहणार आहेत. मार्कंडादेव येथील यात्रेचा जिल्हाधिकारी यांच्याकडून सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मार्कंडादेव यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडाभरापूर्वीच आढावा बैठक घेतली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी पंडा हे यात्रोत्सव कालावधीत पथकांच्या संपर्कात राहून आवश्यक त्या सूचना देणार आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular