VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/चामोर्शी, ०२ मार्च २०२५::- येथील नगरपंचायत भवनात संत शिरोमणी गाडगे महाराज जयंती तसेच स्व. स्वप्नील वरघंटे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक मंगल मानमपल्लीवार, प्रमुख अतिथी म्हणून मंदा लोणारे, देवनाथ गटपायले,सुधाकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर समाजसेवक स्व. स्वप्निल वरघंटे यांच्या फोटोला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी भजन केल्यानंतर गोपाळकाला करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन धोबी समाज महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा किशोरी मोते तर आभार विदर्भ उपाध्यक्ष अनिल मोते यांनी मानले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशनी वरघंटे, अनिलमोते, सुधिर गडपायले, किशोरी मोते, सोनाली गट्टीवार, सौरभ बंडेवार, माया ताजने, दिवाकर ताजने, देवनाथ गडपायले, पिंकी गडपायले, सुभाष गडपायले, ललीता गडपायले, बंडू पेंदोरकर, बंटी पापडकर यांनी सहकार्य केले.
