VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी, ०२ मार्च २०२५::- तालुक्यातील नागरिकांना अनेक समस्या भेडसावीत आहेत.तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आता सार्वत्रिक प्रयत्नांची गरज आहे.अशावेळी प्रशासनाने अलर्ट झोनवर काम करने आवश्यक आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी काल अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात भेट घेत विविध विकास कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.यांनतर ते बोलत होते.सध्या गडचिरोली जिल्ह्यात अजय कंकडालवार यांच्या सामाजिक कार्याची जोरदार चर्चा होत आहे.अनेक अडत्यांना त्यांनी मदतीचा हात देत ते सामाजिक औदार्य जोपासत आहेत.यावेळी चर्चा दरम्यान अजयभाऊ कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,प्रमोद आत्राम,सुधाकर तिम्मा,अनिल इस्टाफ,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
