Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiरेगडी–हळदवाही जि.प. क्षेत्रातील बूथप्रमुखांचे BLA-2 व SIR प्रशिक्षण गोविंदपूर येथे उत्साहात संपन्न...

रेगडी–हळदवाही जि.प. क्षेत्रातील बूथप्रमुखांचे BLA-2 व SIR प्रशिक्षण गोविंदपूर येथे उत्साहात संपन्न…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली /चामोर्शी,१० जुलै २०२६::- रेगडी–हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांसाठी BLA-2 आणि SIR (Special Intensive Revision) संदर्भातील प्रशिक्षण वर्ग गोविंदपूर येथील हॉटेल व्हीला अर्बन सभागृहात उत्साहात पार पडला.

प्रशिक्षण वर्गाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशभाऊ गेडाम, ज्येष्ठ नेते भारत खटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयभाऊ खुणे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार तसेच गडचिरोली विधानसभा SIR प्रमुख हरीशजी माकडे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रणयभाऊ खुणे यांनी रेगडी–हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख व पदाधिकाऱ्यांनी BLA-2 आणि SIR अभियानाशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात (३० जून ते २८ जुलै) प्रत्येक बूथवर BLA-2 ची नियुक्ती करणे, संबंधित सरकारी BLO सोबत समन्वय साधून मतदार नोंदणी अर्जांचे वितरण व भरून घेण्याची प्रक्रिया प्रभावीपणे राबविणे, पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करणे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करणे या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला रेगडी–हळदवाही पंचायत समिती क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे, सुमेन विश्वास, सोम वैद्य, तारक हलदार, महेश विश्वास यांच्यासह जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गामुळे आगामी मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या अनुषंगाने बूथस्तरावरील कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यास दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular