Saturday, September 5, 2026
HomeDesaiganjरामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त २१ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिर...

रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त २१ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिर…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

देसाईगंज येथे युवक काँग्रेस कमिटी व आमदार मसराम मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू,

गडचिरोली/देसाईगंज (वडसा),१९ ऑगस्ट ::- आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार रामदासजी मसराम यांच्या २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार रामदास मसराम मित्र परिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देसाईगंज (वडसा) येथील सिंधू भवन, हुतात्मा स्मारकाच्या मागे येथे आयोजित करण्यात आले आहे.

‘रक्तदान करा… जीवन वाचवा!’ या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आपले रक्तदान कोणासाठी तरी जीवनदान ठरू शकते, त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावा, असे आयोजकांनी म्हटले आहे.

आयोजक : युवक काँग्रेस कमिटी, आरमोरी विधानसभा क्षेत्र व आमदार रामदास मसराम मित्र परिवार.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular